टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी महाराष्ट्रावर मोठं संकट, 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, प्रशासनाकडून…

Follow Us:

राज्यातील हवामानात मोठे बदल होणार आहेत. यादरम्यानच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांसाठी धोकादायक आहेत. नुकताच याबाबत कृषी विभागाकडून थेट इशारा देण्यात आला.

मार्च महिना सुरू असून अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानचअत्यंत मोठा इशारा दिला. 17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठे संकट आहे. यादरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. यादरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील आहे. अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

रब्बीच्या पिकाला काही दिवसांपूर्वीच पावसाने झोडपले, त्यानंतर आता कृषी विभागाकडून हा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काल अमरावती ठरले देशातील सर्वात उष्ण शहर. अरावतीमध्ये 42.2 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचे हे तापमान जास्त असल्याची माहिती.

विदर्भात सध्या उष्णतेची लाट मात्र उद्यापासून अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे. ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे. मात्र उद्यापासून विदर्भात तापमानात बदल होऊन अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात तापमानाचा पार 39 अंशाच्या पुढे गेला असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने फुलांमध्ये देखील वाढ झाली आहे. फुलांच्या हार पाच रुपये प्रमाणे वाढ झाली आहे. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होते मात्र सध्या फुलांची आवक घटल असून तापमान वाढला आहे. तर दुसरीकडे लग्नसराई देखील सुरू झाल्याने मुलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्यात अल्प प्रमाणात फुल शेती केली जाते त्यामुळे नगर जिल्ह्यातून सध्या धुळे जिल्ह्यामध्ये विविध जातींची फुल आणली जात आहे मात्र त्यांची किंमत वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

जगात हाहाकार! इराणची हादरवणारी धमकी, थेट म्हटले, काहीही झाले तरीही…

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती