T20 World Cup 2026 Prize Money Marathi News : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि इतिहास रचला.
T20 World Cup 2026 Prize Money : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि इतिहास रचला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे भारताने सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकत नवा विक्रम केला, तसेच पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर विश्वविजेतेपद पटकावले.
भारताला मिळाले कोट्यवधींचे बक्षीस
या विजयासोबत टीम इंडियाला ट्रॉफीबरोबरच मोठी रक्कमही मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने या स्पर्धेसाठी एकूण 13.5 मिलियन डॉलर्स (सुमारे 120 कोटी रुपये) इतकी प्राईज जाहीर केली. टी-20 विश्वचषक 2026 जिंकल्यानंतर भारतीय संघाला 3 मिलियन डॉलर्स (सुमारे 27.5 कोटी रुपये) इतकी इनामी रक्कम मिळाली. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) दिली जाते आणि त्यानंतर खेळाडूंमध्ये बोनस, मॅच फी आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात वाटली जाते.
न्यूझीलंडला किती रुपये मिळाले?
अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी न्यूझीलंडलाही चांगली प्राईज मनी मिळाली. उपविजेता संघ म्हणून न्यूझीलंडला 1.6 मिलियन डॉलर्स (सुमारे 14.7 कोटी रुपये) इतकी रक्कम देण्यात आली.
उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांची कमाई
या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनाही मोठी रक्कम मिळाली. दोन्ही संघांना 7.9 लाख डॉलर्स (सुमारे 7.24 कोटी रुपये) इतकी प्राईज मनी देण्यात आली.

पाकिस्ताननेही कमावले कोट्यवधी
स्पर्धेच्या सुपर-8 टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या संघांनाही चांगले बक्षीस मिळाले. झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांना प्रत्येकी 3.8 लाख डॉलर्स (सुमारे 3.48 कोटी रुपये) देण्यात आले.
गट टप्प्यात बाहेर पडलेल्या संघांनाही रक्कम
या वेळी आयसीसीने सर्व 20 संघांना प्रोत्साहन देण्यासाठी गट टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांनाही बक्षीस जाहीर केले. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, यूएई आणि अमेरिका या संघांना प्रत्येकी 2.5 लाख डॉलर्स (सुमारे 2.3 कोटी रुपये) देण्यात आले.
हे ही वाचा –
Apple iPhone 18 Pro आणि Pro Max ची माहिती लीक, किंमत, फीचर्स जाणून घ्या
Horoscope Today 9th March 2026 : ग्रहांची चाल बदलली! आज या 3 राशींना मिळणार मोठी खुशखबर











