टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज

Rohit Pawar on Praful Patel :  VSR कंपनीच्या मालकाचा मुलाच्या लग्नाला आपण गेला होतात का? असा सवाल रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना केलाय.

Rohit Pawar on Praful Patel :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) प्रवास करत असलेल्या व्हीएसआर कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या कंपनीविरोधात रान उठवले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्हीएसआर कंपनीचे मालक आर.के. सिंला सीआयडीने (CID) चौकशीसाठी बोलावले होते. तसेच जय पवार यांनी आर.के. सिंगचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सवाल केले आहेत. VSR कंपनीच्या मालकाचा मुलाच्या लग्नाला आपण गेला होतात का? असा सवाल रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना केलाय.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

मिस्टर प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..! असे ट्वीट करत रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. आता रोहित पवार यांच्या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. अलीकडेच अजितदादांच्या अपघाताचा चौकशीचा अहवाल समोर आला आहे. यांनतर अजित पवारांचे पूत्र जय पवार यांनी अहवालावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडीओ जय पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात रोहित सिंह हा विमान हवेत असताना पायलट सीटवर बसून झोपा काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

Today Gold Rate : सोनं उच्चांकापेक्षा 50 हजारांनी स्वस्त, आजचे दर पाहून लगेच घ्याल धाव, 10 ग्रॅम सोन्याची किंमत…

भयंकर युद्धाला सुरूवात, इस्रायलकडून भीषण हल्ला; 7 जणांचा मृत्यू, मध्यपूर्वेत खळबळ

Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?

Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

Horoscope Today 3rd May 2026 : रविवारी या तीन राशींना मिळणार मेहनतीचं फळ… धन-धान्य प्राप्ती आणि… वाचा राशीभविष्य