मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : धंगेकर यांना पक्षातून काढून टाकलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर स्वत: रवींद्र धंगेकर यांनी पोस्ट करत याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

पुणे: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे चर्चेत आहेत. धंगेकर महायुतीत असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते आहेत, मात्र त्यांनी महायुतीतील मित्रपक्षातील बड्या नेत्यांवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील  कोथरुड भागात घायवळ टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. या घटनेवरून धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपचे नेते आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल करत निलेश घायवळ आणि त्यांच्या निकटवर्तीयाचे चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील घायवळ टोळीला आश्रय देत असल्याचं आणि मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर धंगेकरांनी पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन घोटाळ्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधला. त्यांनी मोहोळ यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर धंगेकर यांना एकनाथ शिंदे यांनी समज दिल्याच्या चर्चा पसरल्या होत्या.त्यानंतरही धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) आरोप सुरूच ठेवले, त्यानंतर आता पुन्हा एकदा धंगेकर यांना पक्षातून काढून टाकलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर स्वत: रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोस्ट करत याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

Ravindra Dhangekar: धंगेकरांची मोहोळ यांचं नाव न घेता टीका

रवींद्र धंगेकर यांनी नाव न घेता पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते सोशल मिडीया एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, 2024 ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता. तो कोण आहे, हे आदरणीय फडणवीस साहेबांना माहीत आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय..! मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब…!!, अशी पोस्ट धंगेकर यांनी केली आहे. या पोस्ट त्यांनी #SaveHDN आणि #punelandscam असे दोन हॅशटॅग वापरले आहेत. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या पोस्टमध्ये टॅग केलेलं आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon