महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांची दिवाळी होणार गोड, बॅंक खात्यात येणार ‘इतकी’ भाऊबीज!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Anganwadi workers: राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय.

अंगणवाडी सेविका

Anganwadi workers: यंदाच्या दिवाळीच्या सणाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट दिली जाणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

प्रत्येकी 2 हजार मिळणार 

महाराष्ट्रातील अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने 40.61 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

शासनाकडून रक्कम मंजूर 

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला आणि बालकांच्या पोषण, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून आणि सणाच्या काळात त्यांच्या आनंदात भर टाकण्यासाठी शासनाने ही रक्कम मंजूर केल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या खऱ्या अर्थाने समाजातील ‘शक्ती’ आहेत. त्यांचा सण उत्साहात साजरा व्हावा, हीच आमची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.

खात्यात जमा होणा पैसे 

या निर्णयानुसार, नवी मुंबई येथील आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, यांच्यामार्फत ही भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात जमा होणार आहे. या गिफ्टमुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी अधिक गोड आणि आनंदमय होणार आहे. हा निर्णय त्यांच्या कष्टाचं कौतुक करणारा असून, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

FAQ

प्रश्न: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून किती रक्कम मिळणार आहे?

उत्तर: प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीज भेट म्हणून 2,000 रुपये मिळणार आहेत.

प्रश्न: ही रक्कम वितरणाची प्रक्रिया कशी असेल आणि कोणामार्फत केली जाईल?

उत्तर: ही रक्कम नवी मुंबई येथील आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात वितरित केली जाईल.

प्रश्न: या भाऊबीज भेट योजनेसाठी शासनाने किती निधी उपलब्ध केला आहे?

उत्तर: शासनाने या योजनेसाठी एकूण 40.61 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon