Raju Shetti on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री महोदय तुमच्या कर्माची फळ सामान्य जनता भोगू लागली, तुमच्या धोरणामुळे कुंकू पुसण्याचे पाप; सरकारी ठेकेदारानं गळ्याला दोरी लावताच राजू शेट्टींचा हल्लाबोल

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Raju Shetti on Devendra Fadnavis: हर्षल पाटील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचे आहेत. राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत मिळाला नसल्यानेच त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Raju Shetti on Devendra Fadnavis: जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदराने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हर्षल पाटील  असं त्यांचं नाव असून राज्य सरकारकडून वेळेत बिलं मिळत नसल्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप प्रयत्न सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. हर्षल पाटील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचे आहेत. राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत मिळाला नसल्यानेच त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर राज्यात विरोधकांसह सरकारी कंत्राटदारांचा सुद्धा संतापाचा कडेलोट झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून प्रहार केला आहे.

तुमच्या कर्माची फळ सामान्य जनता भोगू लागली

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले आहे की, शेतकरी आत्महत्येनंतर राज्यात आता ठेकेदार आत्महत्या करू लागले आहेत. मा. मुख्यमंत्री महोदय ही तुमच्या कर्माची फळ सामान्य जनता भोगू लागली आहे.  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील हर्षल पाटील या 35 वर्षाच्या तरूणाने आत्महत्या केली. त्याला पाच वर्षाची लहान मुलगी आहे. एकीकडे ठेकेदारांची बिले देण्यासाठी पैसे सरकारकडे पैसे नाहीत मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी हुडको कडून 20 हजार कोटी कर्ज काढून 86 हजार कोटीचा रस्ता करण्याचा अट्टाहास कशासाठी करत आहात?

कुंकू पुसण्याचे पाप तुमच्या धोरणामुळे होत आहे

त्यांनी पुढे म्हटले आहे की, तुम्ही सामान्य जनतेचा बळी घेऊन जो कारभार करत आहात तो आता शेतकरी आत्महत्या कडून कंत्राटदार आत्महत्यापर्यंत पोहचल आहे.सध्या राज्यात ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती भयावह झाली असून अनेक कुटूंबे आर्थिक दृष्ट्या रसातळाला गेले आहेत. गेली दिड ते दोन वर्षे झाली कामे करून ठेकेदारांना बिले मिळत नाहीत. तुमचे आमदार- खासदार मात्र टक्केवारी घेऊन मदमस्त आहेत. एका बापाच चुणचुणीत लेकरू , एका निरागस मुलीचा बाप , एका पत्नीच्या कपाळाचे कुंकू पुसण्याचे पाप तुमच्या धोरणामुळे होत आहे किमान आता तरी बेधुंदपणा सोडा व थोड सुधारा.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nishikant Dubey: आपटून आपटून मारु बोलणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी पकडलं; हिसका दाखवताच म्हणाले, आप तो…

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon