डॉ.बसवेश्वर पाटील यांच्या पाटील हॉस्पिटल बालरुग्णालयात कावीळ झालेल्या बालकास मिळाले मोफत उपचार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला (प्रतिनिधी):-नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ.बसवेश्वर पाटील यांच्या पाटील हॉस्पिटल बालरुग्णालयात म.ज्योतीराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत कावीळ झालेल्या बालकास मोफत उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला.

वैष्णवी विकास राऊत यांच्या कमी दिवसाची व कमी वजनाच्या दोन्ही मुलांना काविळ झाली होती. या दोन्ही बालकांवर डॉ.बसवेश्वर पाटील यांनी अतिशय योग्य पध्दतीने मोफत उपचार केले. योग्य पध्दतीने मोफत उपचार करुन हॉस्पीटल स्टाफकडून मिळालेल्या सेवेबद्दल डॉ.बसवेश्वर पाटील व हॉस्पीटलमधील स्टाफचे राऊत परिवारांकडून अभिनंदन करुन समाधान व्यक्त करण्यात आले.

डॉ.बसवेश्वर पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बालरुग्णालय हे 24 तास रुग्णांच्या सेवेत तयार आहे.सांगोला तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांनी पाटील हॉस्पीटल बालरुग्णालयातील म.ज्योतीराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बसवेश्वर उत्तम पाटील यांनी केले आहे.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon