टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | 29 जून 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द: CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, नरेंद्र जाधव समितीचा रिपोर्ट आल्यावरच पुढील निर्णय

  2. आता वाशी बिशी काही नाही, थेट मंत्रालय: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत धडकणार

  3. मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, मग हिंदी शिकवण्यासाठी ‘भैय्या’ कुठून आले? दीपक पवारांचा सरकारला प्रश्न

  4. हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये असा सरकारचा प्रयत्न, राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाबाबत अजित पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य

  5. अजित पवारांपाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा हिंदी संदर्भातल्या निर्णयाला विरोध, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत समिती स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती

  6. समृद्धी महामार्गाची पावसाळ्यात नदी झाली, कोण कोट्यवधींचं हॉटेल घेतोय, ज्वलंत हिंदुत्व म्हणजे संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर 150 कोटींची सालारजंगची संपत्ती घेतोय, अधिवेशनाच्या आधीच आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

  7. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

  8. राज्यात जूनमध्ये सरासरीच्या 93 टक्के पाऊस; पूर्व विदर्भासह मराठवाड्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा

  9. ठेच लागल्यावर ‘आई गं’ म्हणायचं की ‘ओ मेरी माँ…’: पहिली ते चौथीच्या बाळांना कन्फ्युज करू नका, दिग्दर्शक केदार शिंदेंचा हिंदीसक्तीला विरोध

  10. हिंदी सक्तीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक: मुंबईत हिंदी जीआरची होळी करत जोरदार घोषणाबाजी, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

  11. इतके नालायक सरकार महाराष्ट्रात कधीच झाले नाहीत: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, महिला पोलिसही सुरक्षित नाही; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

  12. अरबी समुद्रात चक्राकार वारे: तळ कोकणाला ऑरेंज अलर्ट, पुढील दोन दिवस पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज

  13. ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू, चेंगराचेंगरीत 50 हून अधिक भाविक जखमी

  14. वाद्यांच्या गजरात संत तुकोबांच्या पालखीचे इंदापुरात स्वागत: शेकडो वारकरी व भाविकांच्या उत्साहाने रंगले दुसरे रिंगण, सर्वत्र भक्तिमय वातावरण

  15. शिवसैनिक भानगडीशिवाय घडत नाही: राणेंनी काय नाही केलं? तुरुंगात गेले, भानगडी केल्या, मर्डर…, मंत्री भरत गोगावलेंचे विधान

  16. T-20 विश्वचषक जिंकून एक वर्ष पूर्ण झाले: रोहितने इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ, लिहिले- आजच्याच दिवशी; सूर्या-पंड्यानेही पोस्ट केली

  17. आशिया कप भारतात, पण पाकिस्तान इथे खेळणार नाही: भारतही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला गेला नाही; स्पर्धा 10 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते

  18. झिम्बाब्वेविरुद्ध आफ्रिकेने पहिल्या दिवशी ४१८ धावा केल्या: प्रिटोरियस हा पदार्पणात १५० धावा करणारा सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा