india worldmaharashtrasolapurtop news

लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय

सोलापूर : काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी सध्या सुरू असलेल्या जातीय व धार्मिक राजकारणावरुन जोरदार प्रहार केला आहे. सोलापूरमधील एका विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. मला वाईट वाटतं एका गोष्टीच, परवा विधानसभेच इलेक्शन झालं आणि माझे खासदारकीचे पण झाले. कधीही तुम्ही जात-पात धर्म मानला नाही, तुम्ही कामाला मतदान केलं. मात्र, मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही धर्मावर मतदान केलं. तुम्ही कामाला मतदान दिलं नाही, तुम्ही जय श्रीरामला मतदान केलं तर कधी कुराणला मतदान केलं असे म्हणत सांप्रदायिक राजकारण (Politics) व वादावरुन खासदार प्रणिती शिंदेंनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. लग्न (marriage) करायचं असेल तर ठीक आहे, पूजा करायची असेल तर ठीक आहे, पण इलेक्शन मध्ये, राजकारणामध्ये? धर्म आणि जात विचारत घेतल्याची खंत प्रणिती यांनी व्यक्त केली.

तुम्ही कामाला मतदान केलं नाही, याचा मला वाईट वाटलं. कारण ही मातृभूमी सगळ्यांची आहे. या मातृभूमीने केव्हाच भेदभाव केला नाही. मिनी इंडिया, छोटा भारत कुठे आहे माहिती आहे? इकडे शास्त्रीनगर मध्ये बघा आजूबाजूला असे प्रणिती शिंदेंनी म्हटलं. मी आज सकाळी मोहोळ तालुक्यातल्या मुंढेवाडी गावात जाऊन आले, या गावात शंभर टक्के मराठा राहतात. मराठा म्हणजे हिंदूं ना? असा प्रश्न प्रणिती यांनी उपस्थितांना  विचारला. मुंढेवाडीत ग्रामदैवत कोण आहे माहितीय? दर्गा आहे… बीबी फातिमा.. बीबीचा दर्गा आहे . पण तेथील सर्व हिंदू लोक म्हणतात या देवामुळेच आमचं गाव चांगल आहे, असे म्हणत हिंदू-मुस्लीम न करता प्रत्येक धर्माचा आदर-सन्मान केला जात असल्याचं शिंदे यांनी म्हटलं.

आज मला या देशाचं वाईट वाटतय

मी असं खूप ठिकाणी बघितलं आहे, गाव पूर्ण मुस्लिम आहे आणि गावात देव देवी असते, ज्यांना सगळे मानतात. आपण कधीही भेदभाव केला नाही. आज इलेक्शन नाही, पण मला आपल्याशी बोलावसं वाटतंय. मला माफ करा, मी बोलू की नको बोलू? असा सवालही त्यांनी उपस्थितांना पुन्हा विचारला. कारण का मला वाईट वाटतं, मी देशासाठी काम करते, मी कोणत्या एका धर्मासाठी समाजासाठी काम करत नाही. जे गरीब आहेत त्याच्यासाठी मी काम करते. फक्त सोलापूर नाही, आज मला या देशाचा वाईट वाटतंय. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मला देशाचं वाईट वाटतंय, असे म्हणत धर्मांध व जातीय राजकारणावरुन प्रणिती शिंदेंनी खंत व्यक्त केली.

आपल्या देशाचा कणा सर्वधर्मसमभाव

आपल्या देशाचा कणा, आपल्या देशाचा आत्मा सर्वधर्मसमभाव आहे. आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे, कधीही जात-पात मानला नाही, कधी धर्म मानला नाही. लग्न करायचं असेल तर ठीक आहे, पूजा करायची असेल तर ठीक आहे, पण इलेक्शन मध्ये, राजकारणामध्ये? धर्म आणि जात विचारत घेतल्याची खंत प्रणिती शिंदेंनी बोलून दाखवली. तर, धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही, असेही त्यांनी म्हटले.

Related Articles

Back to top button