टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

‘मातोश्रीवर चाललोय!’, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान राज यांची गुगली

Raj Thackeray On Matoshri:  राज ठाकरेंनी गाडीची काच खाली करुन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलंय.

Raj Thackeray On Matoshri: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची सर्वात जास्त चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही यासाठी सकारात्मक दिसत असले तरी आता पहिलं पाऊलं कोण टाकणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेने आता साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

राज ठाकरेंचें निवासस्थान शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील राजकारणाचे एक केंद्र म्हटले जाते. सत्ताधारी असो वा विरोधक, शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी येत असतात. चहापानासाठी आलो होतो, सहज भेटीसाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया देत असले तरी शिवतीर्थावरील भेटीतून अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे माध्यमकर्मींचादेखील शिवतीर्थाबाहेर राबता पाहायला मिळतो. आज राज ठाकरे शिवतीर्थाहून बाहेर पडले आणि गाडीत बसून कुठेतरी चालले होते.

यावेळी पत्रकारांनी नेहमीप्रमाणे त्यांना अनेक प्रश्न विचारले. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? तुम्ही टाळी देणार का? मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? असे अनेक प्रश्न त्यांना एकाचवेळी विचारले गेले. त्यात एक प्रश्न तुम्ही कुठे चाललात? हादेखील होतो. दरम्यान राज ठाकरेंनी गाडीची काच खाली करुन पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर दिलंय.

पत्रकारांची फिरकी

‘मातोश्रीवर चाललोय’ अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानंतर तात्काळ घरगुती कामासाठी बहिणीकडे चाललोय, असे ते पुढे म्हणाले. राज ठाकरेंचा मिश्किल स्वभाव आणि हजरजबाबीपणा साऱ्यांच्या परिचयाचा आहे. त्यामुळे ‘मातोश्रीवर चाललोय’ असे म्हणून फिरकी आपली फिरकी घेतली गेलीय, हे कळायला पत्रकारांना फारसा वेळ लागला नाही.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now