दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संकेत नाही तर बातमीच देणार, मनसेशी युती करण्याबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक: झीशानला कॅनेडियन पोलिसांनी पकडले; लॉरेन्स गँगने सिद्दीकींवर गोळीबार केला होता
-
मस्कची कंपनी स्टारलिंकला दूरसंचार मंत्रालयाची मान्यता: भारतात हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट देणार; ₹840 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड डाटा
-
राहुल म्हणाले- मोदींना सरेंडरची सवय: ट्रम्प 11 वेळा म्हणाले- त्यांनी मोदींना सरेंडर करवले, पण मोदी काहीही बोलू शकले नाहीत
-
पंतप्रधानांनी तिरंगा दाखवून चिनाब आर्च ब्रिजचे उद्घाटन केले: मोदी म्हणाले- CM ओमर देखील सातवी-आठवीपासून या प्रकल्पाच्या पूर्णतेची वाट पाहत होते
-
मल्ल्या म्हणाला- जेटलींना सांगितले होते, जातोय म्हणून: मी फरार नाही, मला चोर म्हणणे चुकीचे; 6200 कोटींच्या बदल्यात बँकांनी 14000 कोटी वसुल केले
-
अमित ठाकरे गोड मुलगा, त्याच्या भूमिकेचे काका म्हणून स्वागत: राज-उद्धव ठाकरेंच्या युती बाबत संजय राऊत यांचा प्रतीक्षा करण्याचा सल्ला
-
सलमान-संजयच्या ‘द 7 डॉग्स’ चित्रपटाचा टीझर रिलीज: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये दिसणार, वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार
-
उद्धव ठाकरेंनी युतीसाठी एक कॉल करावा, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील, मनसेच्या अविनाश जाधवांनी स्पष्टच सांगितलं
-
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे,राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मनसे केंद्रीय समितीतील पदाधिकाऱ्याचं मत, दोन भावांतल्या फुटीमुळं कंगना राणावत, किरीट सोमय्यांसारख्या परप्रांतीयाची दादागिरी वाढली, मनसैनिकांची भावना
-
दोन्ही पवार एकत्र येण्यास माझा विरोध ही अफवा, पण सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, सुनिल तटकरेची माहिती
-
लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक, मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी पुन्हा वळवला
-
कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करा, लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहेर
-
पुढील तीन ते चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
-
गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींच्या सामूहिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी, पोलिस बनले वऱ्हाडी, कार्यक्रमादरम्यान थेट जनतेत जात मुख्यमंत्र्यांचा आदिवासी बांधवांशी संवाद
-
रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्याची कपात, गृह कर्जासह सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार
-
पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये
-
बंगळुरुतील चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावर अटक, आरसीबीचे आणखी तीन अधिकारीही ताब्यात
-
टीम इंडिया इंग्लंडला रवाना: दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका; पहिला सामना 20 जूनपासून
-
पियूष चावलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली: लिहिले- विश्वचषकाच्या आठवणी माझ्या मनात नेहमीच राहतील; 2 IPL जेतेपद जिंकले












