टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सतर्क राहा! निसर्ग धारण करतोय रौद्र रूप; राज्यात पुन्हा जोर धरणार पाऊस, कोणकोणत्या भागांना बसणार तडाखा?

Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather News : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावलेला असतानाच मागील 48 तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानाच वाढ होताना दिसली. मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकणातील काही बागांमध्येही आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा अधिक जाणवू लागला. पुढील 24 तासांमध्ये मात्रस हे चित्र पुन्हा बदलणार असून, राज्यात निसर्ग काहीसा रौद्र रुप धारण करताना दिसेल. ज्यामुळं पुढचे काही दिवस राज्याला वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

विश्रांतीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पुढचे दोन ते तीन दिवस पाऊस नागरिकांच्या अडचणींमध्ये भर टाकताना दिसेल. वादळी पावसाच्या धर्तीवर राज्याच्या काही भागांना हवामान विभागानं यलो अलर्ट देत नागरिकांसह यंत्रणांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

पाऊस पुन्हा सक्रिय झाला…. 

पाऊल धीम्या गतीनं का असेना, पण पुन्हा सक्रिय झाला असून, सध्या काही त्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. ज्यामुळं राज्यातील 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यात या आठवड्याचा शेवट वादळी पावसानं होणार असल्याची माहिती हिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी माध्यमांना दिली आहे.

कोणकोणत्या भागांना बसणार पावसाचा तडाखा? 

वादळी पावसाचा मारा प्रामुख्यानं कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. तर, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुण्यासह सोलापूरात आणि राजच्याच्या घाट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल. तिथं मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात नाशिक पट्ट्यालासुद्धाय वादळी पावसाचा मारा सोसावा लागणार आहे. गोंदिया, भंडारा, नंदुरबार, लातूर भागात मात्र हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

पुढील काही दिवसांसाठी कसं असेल पर्जन्यमान? 

सक्रिय होणारा मान्सून आणि वाऱ्याची बदलणारी दिशा यामुळं 7 ते 10 जूनदरम्यान राड्याच्या विविध भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. ज्यानंतर थेट 13 ते 18 जूनदरम्यान राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसेल. काही जिल्ह्यांना अतिवृअषटीचा मारा सहन करावा लागेलस तर काही ठिकाणी नदीनाले दुथडी भरून वाहू लागलील असाही प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती