maharashtratop news

थंडीचा जोर वाढला! आता येत्या 3 दिवसांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा

Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रीय झालेल्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून बहुतांश ठिकाणी 2 ते 4 अंशांनी घसरल्याचे हवामान विभागाने सांगितले. राज्यात येत्या 24 तासांत किमान तापमान वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असून विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.बुधवारी मराठवाडा, विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. धुळ्यात किमान तापमान 4.4 अंशांवर पोहोचले होते. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात कमालीची घट झाली असून नागरिक थंडीनं कुडकुडले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

सध्या भारताच्या वायव्य भागात नव्याने पश्चिमी चक्रावात (Western disturbance ) तयार झाला आहे . तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढण्यास मदत होतेय .मागील दोन दिवसांपासून तापमानात चढउतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने 24 तासानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

हवामान विभागाचा अंदाज काय?

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 24 तासात तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असून किमान तापमान घसरणार आहे . (Temperature drop) विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे .विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय . प्रादेशिक हवामान केंद्रानुसार 10 जानेवारी व 11 जानेवारी रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय .

राज्यभरात किमान तापमानाचा पारा किती ?

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात किमान तापमानात चढ उतार दिसत आहे . राज्यात कोरडे वारे वाहत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा (temperature update) पारा उतरलाय .मंगळवारी पुण्यात 12 ते 15 अंश सेल्सिअसची नोंद झाली असून पहाटे गारठा वाढला होता . बहुतांश मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घटले होते .12 ते 16 अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे .(IMD forecast Maharashtra)

Related Articles

Back to top button