ही ट्रॅव्हल्स शिरपूर लातूर येथून पुण्याकडे निघाली होती. अपघातावेळी ट्रॅव्हल्समध्ये मुख्यतः मराठवाडा आणि पुणे भागातील प्रवासी होते.
1/7

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास टेंभुर्णी जवळील आढेगाव शिवारात एक प्रवासी ट्रॅव्हल्स पलटी झाली.
2/7

ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या या भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
3/7

ही ट्रॅव्हल्स शिरपूर लातूर येथून पुण्याकडे निघाली होती. अपघातावेळी ट्रॅव्हल्समध्ये मुख्यतः मराठवाडा आणि पुणे भागातील प्रवासी होते.
4/7

पहाटे चालकाला झोप लागल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली, अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.
5/7

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
6/7

जीवितहानी झाली नसली तरी ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने प्रवासी मोठया प्रमाणावर जखमी झाले आहेत.
7/7

घटनास्थळावर मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहेत.