टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

NCP News : मोठी घडामोड! शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

Maharashtra Politics : पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती आहे. साखर संकुलात कृषी तंत्रज्ञानावर चर्चा झाली. यानंतर तीन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावं, यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. उपमुख्मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष महाविकास आघाडीत आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या चर्चा सुरु असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. तीन दिग्गज नेत्यांची एकत्र आणि बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात साखर संकुलात आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना काय फायदा होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार, शरद पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह इतर नेतेदेखील उपस्थित होते. पण या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.

साखर संकुलाकील बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील वगळता सर्व नेते बैठकीतून बाहेर पडले. केवळ शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील बैठकीच्या रुममध्ये बसून होते. या वेळी तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या बैठकीची टायमिंग महत्त्वाची आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर

Omraje Nimbalkar Operation Tiger: ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट

Shivsena MP Opration Tiger Vikas Nidhi: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या फुटलेल्या खासदारांची बुरखा टराटरा फाडणारी माहिती

Uddhav Thackeray Shivsena : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित

ओमराजे निंबाळकराचं अगोदरच ठरलं, विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली

सातारा-सांगलीत भाजपला सर्वात मोठा धक्का, उमेदवार विजयी, पण… मोठा गेम काय झाला? धक्कादायक माहिती समोर