टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

उद्योजक शशिकांत सावंत यांच्याकडून मुलांच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला शैक्षणिक साहित्यासह ५५००/- रुपये देणगी!

सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला येथील प्रसिद्ध उद्योजक शशिकांत बाळासाहेब सावंत यांनी त्यांचे चिरंजीव इंद्रराज व पृथ्वीराज यांच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५५००/- रुपये देणगी तसेच गरीब, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना वाटपासाठी शैक्षणिक साहित्य भेट देऊन वाढदिवस साजरा केला.

सांगोला शेतकरी सूतगिरणी मध्ये, हंगिरगे गावातून येऊन, ३५ वर्ष सांगोला शेतकरी सूतगिरणीत कामगार म्हणून बाळासाहेब शिवाजी सावंत यांनी खूप कठीण परिस्थितीत दिवस काढले. त्यांचा मुलगा शशिकांत बाळासाहेब सावंत, हा सांगोला येथे लागेल तिथे मोलमजुरी करून, पोटाची खळगी भरून,शिक्षण घेत असल्यामुळे सावंत कुटुंबीय सांगोला येथेच स्थायिक झाले. त्यानंतर आहे ह्या परिस्थितीचा सामना करत शशिकांत पोलीस खात्यात भरती झाले, पोलीस खात्यातही प्रामाणिक सेवा करत असताना चांगल्या मित्रांची संगत लाभल्याने, त्यांनी व त्यांची पत्नी ज्योती शशिकांत सावंत यांनी “महालक्ष्मी शु पॅलेस” मिरज रोड येथे हा व्यवसाय सुरू केला. तर शशिकांत यांनी मित्रांच्या सहकार्याने सांगोला व आटपाडी या ठिकाणी गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून “समर्थ पार्क” हा प्रकल्प राबवून तो यशस्वीही केला आहे . शशिकांत यांनी मूळ गावी हंगिरगे येथे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून स्वखर्चाने, मंदिर बांधले असून त्या ठिकाणी आपल्या हातून अन्नदान व्हावे या हेतूने दरवर्षी मोठा महाप्रसाद ठेवण्यात येतो.

गरिबीची जाण, आणि सामाजिक भान असलेले शशिकांत सावंत यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपल्या दोन्ही मुलांचा वाढदिवस यावेळी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचे ठरवून त्यांनी आपुलकी प्रतिष्ठान या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला ५५००/- देणगी तसेच ६ डझन स्क्वायर, ६  डझन पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी साहित्य २७ मे रोजी भेट दिले.

यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, महादेव दिवटे, अरविंद केदार, प्रमोदकाका दौंडे, अरविंद डोंबे, सुरेशकाका चौगुले, रमेश गोडसे, संजय शेळके आदिसह सावंत कुटुंबातील मातोश्री सौ. सखुबाई बाळासाहेब सावंत, वडील बाळासाहेब शिवाजी सावंत, भाऊसाहेब वसंत पाटील, दिपाली भाऊसाहेब पाटील ,सोनाली बाळासाहेब सावंत आदित्य बिले व संपूर्ण परिवार उपस्थित होता.

आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य दत्तात्रय नवले (सांगोला अर्बन बँक ) यांनी दि. २७ मे रोजी असलेल्या त्यांच्या लग्नाच्या २२ व्या वाढदिवसानिमित्त २२००/- रुपये देणगी आपुलकी प्रतिष्ठानला देऊन आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now