टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Top Headlines : टॉप हेडलाईन्स | 21 मे 2025 | बुधवार

On: May 21, 2025 7:46 PM
Follow Us:

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार, अनेक भागात पिकांचं नुकसान, यंदा मान्सूनही वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

  2. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट

  3. ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला जवानांचाही सहभाग होता: BSFचे DIG म्हणाले- पाकचे बंकर उध्वस्त केले, 50 दहशतवाद्यांची घुसखोरी रोखली

  4. CJI म्हणाले- वकिलांना सुट्टीच्या काळात काम करायचे नाही: न्यायाधीशही सुट्टीवर असतात, पण प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला जबाबदार धरले जाते

  5. अकरावी प्रवेशाला सुरुवात: पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ

  6. मोदी 200 देश फिरले, पण फायदा झाला नाही: परदेशात जाणारे शिष्टमंडळ म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संजय राऊत यांची बोचरी टीका

  7. शत्रूला सांगून हल्ला करणे हे देशप्रेमाचे लक्षण आहे का?: पाकचे 15 हजाराचे ड्रोन 15 लाखांच्या क्षेपणास्त्राने पाडले – विजय वडेट्टीवार

  8. आता 200 रुपयातच होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी: राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा

  9. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर: पूजाने कोणताही मोठा गुन्हा केला नाही, सर्वस्व गमावले, तिला कुठेही नोकरी मिळणार नाही – SC

  10. पाक दहशतवादी आमिर हमजा जखमी असल्याचा दावा: लष्करी रुग्णालयात दाखल, हाफिज सईदचा निकटवर्तीय, भारतात हल्ल्याचा कट रचला होता

  11. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढील 36 तासांत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

  12. मला पाकिस्तानात लग्न करायचं आहे, गद्दार ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबतचं नवं चॅट समोर, ज्योतीची पाकिस्तानात अनेक बँक खाती असल्याचंही उघड

  13. छत्तीसगडमधील अबूझमाडच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असलेला नक्षली संघटनेचा सेक्रेटरी राजू बसव ठार, पंतप्रधान मोदी, अमित शाहांकडून कारवाईचं कौतुक

  14. सरन्यायाधीश हे कायस्वरूपी ‘राज्य अतिथी’, भूषण गवईंच्या नाराजीनंतर राज्य सरकारकडून परिपत्रक जारी

  15. ‘साथी’ पोर्टलवरील प्रमाणित बियाणे घ्या, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, महाविस्तार अॅपवरुन शेतकऱ्यांना A To Z माहिती देणार

  16. IPL मध्ये ऑलराउंडर्सचा दबदबा कमी होत चालला: यावेळी 100+ धावा करणारे आणि 10+ विकेट्स घेणारे दोनच खेळाडू, गेल्या वेळी 8 होते

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now