टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण

On: May 16, 2025 12:28 PM
Follow Us:

तहान ही फक्त पाण्याची गरज नाही, तर आरोग्याचं इशाराही असू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला “नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यायचं वाटतंय” असं वाटलं, तर तुमचं शरीर काहीतरी सांगतंय का, यावर जरूर विचार करा.

उन्हाळ्यात तहान लागणं हे साहजिक आहे. घाम, उष्णता या सगळ्यामुळे शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होते आणि ते भरून काढण्यासाठी शरीर आपल्याला पाणी प्यायचं इशारा देतं. पण, जर तुम्ही सतत पाणी पीत असाल आणि तरीही घसा कोरडा वाटत असेल, तहान भागत नसेल तर हे लक्षण काहीसं चिंताजनक आहे.

तहान ही शरीराची गरज आहे, पण काही वेळा ती गरजेपेक्षा जास्त जाणवते. ही जास्त तहान काही वेळा एका गंभीर आजाराची चाहूल देऊ शकते. त्यामुळे ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

सतत तहान लागण्यामागे ‘हे’ कारणं

1. रक्तातील साखरेचं असंतुलन : जर शरीरात साखरेची पातळी खूप वाढलेली असेल, तर किडनी ती बाहेर टाकण्यासाठी अधिक पाणी वापरते. परिणामी, लघवी जास्त होते आणि शरीर पुन्हा पाण्याची मागणी करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा अती तहान लागते आणि वारंवार लघवी होते.

2. डिहायड्रेशन : गरमी, जास्त व्यायाम, उलट्या, जुलाब किंवा लघवीद्वारे शरीरातलं पाणी कमी झालं, की शरीरात त्वरित पाणी हवं असतं. पण काही वेळा आपल्याला कळत नाही की आपण डिहायड्रेट झालो आहोत.

3. जास्त मीठ किंवा मसालेदार अन्न : अन्नातलं मीठ शरीरातील सोडियमची पातळी वाढवतं, आणि ते संतुलित ठेवण्यासाठी शरीर जास्त पाण्याची मागणी करतं. त्यामुळे रोजच्या जेवणात मीठाचं प्रमाण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

4. ताप, संसर्ग आणि झोपेचा अभाव : तापाच्या काळात शरीर गरम होतं आणि उष्मा नियंत्रित करण्यासाठी अधिक पाणी गरजेचं असतं. त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव आणि अपुरी झोपसुद्धा शरीराच्या द्रव संतुलनावर परिणाम करू शकते.

5. डायबिटीज : हा आजार मधुमेहापेक्षा वेगळा आहे. यात किडनी पाणी नीट साठवू शकत नाही. त्यामुळे वारंवार लघवी होते आणि सतत तहान लागते.

डॉक्टरांकडे कधी जायचं?

1. जर तुम्हाला अचानक तहान प्रचंड प्रमाणात वाढल्यास

2. पाणी पिऊनही तहान भागत नसल्यास

3. सतत लघवी होत असल्यास

4. वजन वेगाने कमी होत असल्यास

5. थकवा, चिडचिड, झोपेचा त्रास जाणवत असल्यास

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now