india worldmaharashtrapoliticalsolapurtop news

लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले; घेतला पहिला निर्णय

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. यानंतर हेमंत सोरेन यांनी मैय्या सन्मान योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. महिलांना दिली जाणारी रक्कम वाढवून ती 2500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार

झारखंडच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा न होता केवळ काल हेमंत सोरेन यांचा शपथविधी झाला. झारखंडच्या मंत्रिमंडळाची संख्या 12 इतकी आहे. राज्यपाल संतोष गंगवार यांनी रांचीतील मैदानावरील आयोजित कार्यक्रमात हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची पथ दिली. शपथविधीनंतर हेमंत सोरेन यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मैय्या सन्मान योजनेतील रक्कम  एक हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत. डिसेंबर महिन्यापासून महिलांना 2500 रुपये मिळतील.

 

*Black Friday Sale*🖤

स्मार्टवॉचवर 70 % पर्यंत सूट*

*टायटन वर्ल्ड | टायटन आय+*

फोटो विश्व कलर लॅब जवळ,
भोपळे रोड ,सांगोला
संपर्क –  7507 995 995

Related Articles

Back to top button