Friday, October 18, 2024
Homemaharashtraयुतीत माती नको! शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध, भाजपच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

युतीत माती नको! शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध, भाजपच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

नागपूर : महायुतीमध्ये जागा वाटपावरून आधीच रस्सीखेच सुरू असताना रामटेक मतदारसंघ शिवसेनेस (शिंदे गट) देण्यास विरोध करणारे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तडकाफडकी पक्षातून निलंबित केले.

भाजपसह सर्व पक्षात इनकमिंगचा वेग वाढला होता. मात्र, शिवसेनेला विरोध करत बंडाचा इशारा देणाऱ्या रेड्डी यांना निलंबित करून बावनकुळे यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला.

रामटेक विधानसभा मतदारसंघात रेड्डी आणि विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांच्यात सुरुवातीपासून राजकीय वाद आहे. रेड्डी यांनी २०१४ साली जयस्वाल यांचा पराभव केला. जयस्वाल यांनी गेल्या निवडणुकीत उट्टे फेडले. जयस्वाल यांची बऱ्याच महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा होती.

बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा

शिंदे सेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर उमेदवारी जाहीर झाली. यास रेड्डी यांनी तीव्र विरोध केला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रेड्डी यांच्या बंडखोरीच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली. रेड्डी यांच्यावर पक्षांतर्गत मुद्दे चव्हाट्यावर आणणे आणि पक्ष शिस्तीचे उल्लंघन करण्याचा ठपका ठेवत बावनकुळे यांनी त्यांना निलंबित केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments