विधानसभा जिंकल्यानंतर भाजपची ‘शत-प्रतिशत’ची तयारी; महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

कोल्हापूर: राज्य सरकारवर कोणी कितीही काळी जादू करु दे. भाजपकडे तब्बल 137 आमदार आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे सरकार मजबूत राहील, असे वक्तव्य भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. ते रविवारी भाजपच्या (BJP) पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यशाळेत बोलत होते. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू (Black Magic) करण्यात आल्याचा आरोप केला होता. वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये, यासाठी ही काळी जादू करण्यात आली आहे. त्यामुळे  देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की, मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री झोपायला जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपला कोणी कितीही काळू जादू केली तरी फरक पडत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सुचित केले आहे.

भाजपच्या कोल्हापूरमधील या कार्यशाळेला चंद्रकांत पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.  राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये भाजपची सत्ता यायला हवी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. पुढील 15 वर्षे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत राहण्यासाठी सर्व जिल्हा परिषदा, महापालिका , नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये  भाजपची सत्ता येण्यासाठी राज्यात 1 कोटी 51 लाख सदस्य असणे आवश्यक आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख इतकी सदस्य नोंदणी झाली आहे.  हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे 2 कोटी 20 लाख तर मोफत वीजेच्या 40 लाख कृषी पंपधारकांना भाजपचे सभासद करुन घ्या, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज्यात भाजपचे अधिकाअधिक सदस्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 13 हजार जणांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल. राज्यातील सर्व 36 जिल्हा  परिषद आणि 27 महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

विधानसभा जिंकल्यानंतर भाजपची ‘शत-प्रतिशत’ची तयारी; महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत

 

IPL 2025 Schedule : आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी फक्त याच महिला पात्र, अजितदादांकडून सर्वात मोठी अपडेट

सांगोला तालुक्यात जीबीएसचा पहिला रूग्ण आढळला; आरोग्य विभाग सतर्क

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon