टॉप न्यूज

धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न फसला…

अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, मुंबईतील बोरिवली स्थानकावर सुरू झालेली लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना पडल्याने एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. प्रगती घरत (४३) असे  या शिक्षिकेचे नाव आहे.

प्रगती या मालाड येथील एका शाळेत शिक्षिका होत्या. त्या वसईत राहत होत्या. त्या दररोज बोरिवलीत ट्रेन बदलायच्या. सकाळी नेहमीप्रमाणे त्या बोरिवली स्थानकावर उतरल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटणाऱ्या चर्चगेट ट्रेनच्या सेकंड क्लासच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. मात्र, ट्रेन नुकतीच सुरू झाली होती. 

HTML img Tag Simply Easy Learning    
ती पकडण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला आणि त्या प्लॅटफॉम व ट्रेनच्या मधील मोकळ्या जागेत अडकल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर प्रगती यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!