ठाकरे-शिंदेंच्या वादाचे आम्हाला देणं-घेणं नाही ; अजितदादा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
मुख्यमंत्र्यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छोट्या गोष्टीत रमू नका, म्हणत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी शिंदे यांना विधानसभेत चांगलेच सुनावले आहे. शिंदे हे नेहमीप्रमाणे जुन्या गोष्टीमध्ये रमले, असा टोला पवार यांनी लगावला आहे.
सभागृहात आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे मुद्दे उपस्थित केले, आता तुम्ही ज्यांना सोडून आलात, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार. ते तुम्ही मनाला लावून घेणार. ते तुम्ही इथे सांगणार.
आम्हाला काय देणं-घेणं आहे त्याचं. यशवंतराव चव्हाणांची शिकवण बघा. आचार्य अत्रे त्यांच्यावर किती टीका करायचे, पुस्तकात वाचले असेल. तरी ते दिलदारपणे घ्यायचे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळाले आहे. या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात. असल्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचे मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही, अशा शब्दात पवार यांनी शिंदे यांना खडेबोल सुनावले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon