टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांची पार्थ-जय पवारांसोबत बैठक

Follow Us:

Sharad Pawar in Baramati: अजित पवार यांच्या निधनानंतर आमच्यासमोर एकमेकांना धीर देणे आणि या सगळ्यातून बाहेर पडून पुन्हा उभे राहणे, हे लक्ष्य असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

Ajit Pawar and Sharad Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची हाती घेतल्यानंतर आता अजितदादांकडे (Ajit Pawar) असणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांमधील पदांचीही पवार कुटुंबात वाटणी केली जाणार आहे. अजित पवार हे अनेक सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांवर संचालक किंवा अध्यक्ष पदावर होते. या पदांबाबत आता पवार कुटुंबीयांकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. बारामती (Baramati) येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. याठिकाणी शरद पवार (Sharad Pawar) आणि पार्थ पवारांचे चिरंजीव जय पवार, पार्थ पवार (Parth Pawar) हे उपस्थित होते. यावेळी अजित पवार अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागेवर पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले. (Baramati news)

अजित पवार हे माळेगाव साखर कारखाना चेअरमन, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त, महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष पद, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य, रयत शिक्षण संस्था संचालक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष अशा  विविध पदांवर कार्यरत होते. या पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार आहे. काही महत्त्वाची पदं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती. तर जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे कोणती पदे जाणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शरद पवार, पार्थ पवार जय पवार आणि विद्या प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाची ही बैठक काहीवेळापूर्वी संपली आहे. त्यानंतर शरद पवार, पार्थ पवार, विजया पाटील आणि जय पवार यांची बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये भविष्यातील राजकीय समीकरणांची चर्चाही होऊ शकते. पवार कुटुंबीय आपापसात ही पदं कशाप्रकारे वाटून घेणार, हे बघावे लागेल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने…; महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे भीषण सत्र सुरू

Horoscope Today 8th May 2026 : चिंता सोडा, निवांत रहा.. या राशीला शुक्रवारी मिळेल मोठी ऑफर ! वाचा मेष ते मीनचं भविष्य

राज्याच्या राजकारणात खळबळ, बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला; नेमके कारण काय?

राज्यात कायदा आहे की नाही ? जेसीबीला लटकवलं, फरपटत नेलं आणि … मुरूम माफियांचा तहसीलदारावर जीवघेणा हल्ला !

Bengal Violence : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या; चारपैकी तीन गोळ्या थेट डोक्यात

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना या 8 पदार्थांपासून ठेवा लांब; नाहीतर होईल पश्चात्ताप