टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार

Follow Us:

शिवसेनेचा नवा चेहरा म्हणून अलीकडे सुषमा अंधारे गाजत आहेत. राज्यातील शिंदे सरकारने त्यांचा धसका घेतला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंधारे या आक्रमक बोलत आहेत. त्यांनी अनेक नेत्यांची पोलखोल केली आहे. यामुळे त्यांच्याबद्दल वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे. त्या बेधडकपणे बोलताना दिसत आहेत.

दरम्यान त्यांना रोखण्यासाठी शिंदे सरकारने वेगळीच खेळी केली आहे. अंधारे यांचे विभक्त पती वैजिनाथ वाघमारे हे आज शिंदे गटात डेरे दाखल होणार आहेत. आज सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान आगामी काळात सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करण्याचा इशारा वाघमारे यांनी दिला आहे.

आपण सुषमा यांच्याबरोबर पंधरा वर्षे काम केले आहे. पाच सहा वर्षांपासून त्यांचा व माझा काहीही संबंध राहिला नाही. परंतु त्यांनी राज्यातील एका मंत्र्यांबद्दल केलेल्या  टिपणी बद्दल पर्दाफाश करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय कमी वेळेत उत्कृष्ट काम केले आहे त्यांच्या या कामामुळे मी भारावलो आहे. त्यामुळेच शिंदे गटात जात असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच

विधान परिषद जागा वाटपाचा काय फॉर्म्युला? भाजपलाच सर्वाधिक जागा? एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे संकेत

मोठा विध्वंस! थेट अणुऊर्जा प्रकल्पाला उडवलं, भीषण हल्ल्याने जगात खळबळ, आगीच्या ज्वाळा थेट…

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! कर्जमाफीची तारीख समोर, CM फडणवीसांची मोठी घोषणा

प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक, पुण्यातील..