दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
एकट्याने जाऊन-येऊन विलीनीकरण होणार नाही: सगळे एकत्र येऊन गळ्यात हात घालून ठरवावं लागेल- छगन भुजबळ
-
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: भरधाव कंटेनरची 15 ते 20 वाहनांना जोरदार धडक; मदतीसाठी माजी मंत्री राजेश टोपेंची धाव
-
‘मंत्र्यांची ही अवस्था तर सामान्यांचे काय?’: विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका; मंत्री संजय शिरसाटांच्या घरावर झाला होता हल्ला
-
तरुणांची फसवणूक खपवून घेणार नाही, दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा: एसटीच्या कंत्राटी भरतीवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
-
आसाममध्ये बस-ट्रकची धडक, 23 जणांचा मृत्यू, बहुतांश विद्यार्थी: गाडी कापून मृतदेह बाहेर काढले; बसचे 12 चलान यापूर्वीच कापले गेले होते
-
सोने 7 महिन्यांनंतर ₹1.36 लाखांच्या खाली: 3 दिवसांत ₹6,536 स्वस्त; चांदी ₹3,500 घसरून ₹1.77 लाखांवर आली
-
विलीनीकरणाबाबत भुजबळ बोलले ते खरंच असावं, अजितदादा-जयंत पाटलांच्या चर्चेचे ते साक्षीदार, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य, तसेच शरद पवारांची भेट घेणं म्हणजे विलीनीकरणासाठी हालचाली नव्हेत, सध्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, तटकरेंचे स्पष्टीकरण
-
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना पार्थ पवारांनी घेतली राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक
-
छठपूजेच्या नावाखाली मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी संघर्ष पेटवण्याचा भाजपचा डाव, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच आटापिटा, राज ठाकरेंचा आरोप
-
राहुल गांधींचा आरोप- मोदी माझा फोन टॅप करत आहेत: चर्चेनंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, 12 दिवसांत सातव्यांदा आव्हान
-
मोदी-शाहांच्या राज्यात आणखी काय होणार? फोन टॅपिंगच्या आरोपांवर संजय राऊतांची भाजपवर टीका
-
‘रामायण’ने 8 दिवसांत कमावले ₹1,033 कोटी: सर्वात वेगाने ₹1,000 कोटी कमावणारा तिसरा भारतीय चित्रपट; आज ‘पठाण’चा विक्रम मोडू शकतो
-
अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार, नूतन अध्यक्ष राजेश पाटलांचे संकेत, शनिवारी होणाऱ्या पहिल्याच बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव येणार, तर गाय आणि म्हशीच्या दुधात चार रुपयांची वाढ करण्याचा राज्यातील दूध उत्पादक संघटनेचा निर्णय
-
संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर तीन मद्यपींचा राडा, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिरसाटांचा सवाल
-
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल
-
टीम इंडियासाठी काळा दिवस, चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताला 244 धावांनी लोळवलं, 334 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 89 धावांत गारद
-
रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं
-
इंदूरमध्ये वैभवचे विशेष प्रशिक्षण, वेग वाढवण्यावर लक्ष: पर्सनल कोचसोबत मैदानावर लावली धाव; बिहारचा कर्णधार जिम-स्विमिंगही करत आहे.








