दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. कारण, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Nandurbar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. कारण, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी असेल असं मत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
दोन्ही शिवसेना एकत्र येणार की नाही, याबाबत चंद्रकांत रघुवंशी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिवसेना दुभंगली गेली, त्याच दिवशी हा दुर्दैवी प्रसंग यायला नको होता असे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.







