टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..

On: October 31, 2026 1:08 PM
Follow Us:

Harshada Deshmukh: पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली, असं हर्षदा देशमुख जाधव यांनी म्हटलं.

​सातारा: “पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादामुळेच महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार लाभली आहे.  खासदार सुप्रिया सुळे व महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,” अशी कृतज्ञता नवनिर्वाचित आमदार हर्षदा जाधव देशमुख यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

MPSC आणि तरुणाईच्या जनआक्रोशाचे मतांमध्ये रूपांतर झाले आणि  100 जणांच्या विरोधात एक कार्यकर्ता हत्तीच्या बळासारखे लढल्यानेच हा विजय शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या. विधान परिषदेत पदवीधर, शिक्षण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर पद्धतशीर आराखडा राबवण्याचा निर्धार हर्षदा देशमुख जाधव यांनी व्यक्त केला. या निवडणुकीचा केंद्रबिंदू जनता आणि पदवीधर असतात.

चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक निकालासंदर्भाबाबत केलेल्या वक्तव्याचा फायदा झाला का असं पत्रकारांनी विचारलं असता हर्षदा देशमुख यांनी ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रचाराचात असल्यानं मी कुठलं वक्तव्य ऐकलं नाही, असं हर्षदा देशमुख जाधव यांनी म्हटलं. शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढाई होती. पदवीधरमध्ये एकास एक लढत झाली. शिक्षक मतदारसंघात पाच उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यांच्यामध्ये मतविभागणी झाली. शिक्षक मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाली होती. पुढील वेळी प्रशासनानं बोगस नोंदणी होऊ देऊ नये याची खात्री करावी,असं हर्षदा देशमुख जाधव म्हणाल्या.

विधानपरिषद निवडणूक ही पर्याय म्हणून पाहिली जाते. मात्र, ही निवडणूक लढवताना पर्याय म्हणून पाहिली नाही. विधानसभा -लोकसभा निवडणुकीसाठी मोडस ऑपरेंडी काय करायचं ठरलेलं असतं. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते मोठ्या पदावर राहिलेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन मला लाभेल,असं हर्षदा देशमुख जाधव यांनी म्हटलं.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी शासनाने परत करावी,5 हजारांची तोकडी मदत कागदपत्रांच्या क्लिष्ट अटींविना वाढवून द्यावी आणि मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी विशेष पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शासकीय पोर्टल्समधील (NIC) तांत्रिक अडचणी दूर करण्याची व शिक्षक मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीवर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या पाठिंब्यासोबतच वडिलांच्या प्रशासकीय कारकिर्दीच्या पुण्याईचा मोठा फायदा झाला आणि कडक स्वभावाच्या वडिलांकडून मिळालेली शाबासकीची थाप मनस्वी आनंद देणारी ठरली, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now