टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्रात धो धो पाऊस, 50 ते 60 किमी वेगाने वारे, चक्रीवादळाने फिरली हवा, 10 राज्यात..

On: October 30, 2026 12:56 PM
Follow Us:

Weather Update : राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असतानाच आता मोठा दिलासा मिळाला. राज्यात धो धो पावसाला सुरूवात झाली. हेच नाही तर पुढील काही दिवस राज्यात पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात धो धो पाऊस, 50 ते 60 किमी वेगाने वारे, चक्रीवादळाने फिरली हवा, 10 राज्यात..

भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. देशातील अनेक भागात पाऊस कोसळणार आहे. चक्रावती अर्बन चक्रीवादळाचा मोठा धोका आहे. अनेक राज्यात धो धो पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस बघायला मिळतोय. मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे. पावसासोबतच 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल. पुढच्या 24 ते 48 तासात जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. राज्यातही या चक्रीवादळाचा परिणाम दिसत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. आता पुन्हा पाऊस राज्यातील अनेक भागात कोसळत आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळताना दिसतोय. ओडिसा आणि छत्तीसगढ अर्नब चक्रीवादळाचा फटका बसताना दिसत आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत या चक्रीवादाळाचा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या खाडीत कायम राहिल. अरबी समद्रात या चक्रीवादळामुळे मोठे संकट आले. हिमाचल प्रदेशमध्येही या वाऱ्याचा फटका बसताना दिसेल. अर्नब चक्रीवादळामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा उकाड्यापासून मिळाला. मागच्या काही दिवसांपासून रात्री गारठा जाणवत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशीही राज्यात पाऊस कायम राहणार आहे.

आज, कोकण, घाटमाथा, आणि पूर्व विदर्भासह राज्यातील अनेक भागात पाऊस होईल. हेच नाही तर राज्यात 30 ते 40 किमी वेगाने वारेही वाहतील. ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याच अंदाज आहे. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोदिंया, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात पुढच्या पाच दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले.

पश्चिम बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले. या चक्रीवादळामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक राज्यात या वादळामुळे मोठे नुकसान झाले. पुढील काही दिवसात हे वादळ अजून तीव्र होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग विभागाकडून या वादळाबाबत सतत अलर्ट दिला जात आहे.

हे सुद्धा वाचा

हवेतच दोन हेलिकॉप्टरची समोरा समोर धडक, धाड धाड कोसळले; तिघांचा मृत्यू

Navnath ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now