टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात

On: October 2, 2026 8:56 AM
Follow Us:

मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 2 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाची घोषणा केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून आंदोलनापूर्वीच CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे ‘जेलभरो आंदोलन’ करण्याची घोषणा CJPकडून करण्यात आली होती. शिवाजी पार्क येथे आंदोलनाला परवानगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. 2013 मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा तसेच वाहतूक आणि इतर नियमांचा संदर्भ देण्यात आला आहे.

CJPकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासोबतच निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कायद्यातील बदलांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. CJPच्या या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने काही दावे फेटाळले असून, SIRसह आयोगाचे निर्णय तीनही निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने झाल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आज सकाळपासून शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आता नियोजित आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now