टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅमचा भाव किती?

On: September 29, 2026 10:02 PM
Follow Us:

सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असतानाच 29 सप्टेंबर 2026 रोजी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. मागील 24 तासांत सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली.

जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 51 हजार 925 रुपये इतका झाला आहे. गेल्या महिनाभराचा विचार केला तर सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार 500 रुपयांची घसरण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून एक किलो चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपये इतका आहे. महिनाभरात चांदीच्या दरात सुमारे 16 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

मात्र, सोने खरेदी करताना स्थानिक बाजारातील दर, जीएसटी आणि मेकिंग चार्ज यामुळे अंतिम किंमत बदलू शकते. त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक सराफाकडून ताजा दर तपासणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now