मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या अभिनयासोबतच स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते. तिच्या नव्या फोटोशूटमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
नेहाने या फोटोशूटसाठी ब्लॅक अँड व्हाईट पोल्का डॉट डिझाइनचा स्लीवलेस ड्रेस परिधान केला आहे. साधा पण आकर्षक असा हा लूक तिच्या फॅशन सेन्सला उठाव देताना दिसत आहे.
फोटोशूटदरम्यान नेहा सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिच्या प्रत्येक पोजमध्ये आत्मविश्वास आणि सहजता पाहायला मिळते.
नेहाच्या या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, तिच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेहाने हे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/सोशल मीडिया)









