टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Follow Us:

Australia vs Bangladesh 1st Test : बांगलादेश क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करत इतिहास रचला आहे.

Bangladesh Beat Australia 1st Test by 9 wickets : बांगलादेश क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करत इतिहास रचला आहे. डार्विनच्या मरारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 9 विकेट्सने पराभव केला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामन्यात कांगारूंना पराभूत करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. या विजयासह बांगलादेशने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का दिला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात बांगलादेशने अवघ्या 57 धावांचे लक्ष्य एका विकेटच्या मोबदल्यात सहज गाठले आणि ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या डावात बांगलादेशचा दबदबा 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 198 धावांवरच गाशा गुंडाळला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच यजमान फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. त्यानंतर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात तब्बल 426 धावा उभारत ऑस्ट्रेलियावर 228 धावांची मोठी आघाडी घेतली. या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचे दडपण आले. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली.

मिराजची फिरकी ऑस्ट्रेलियाला भोवली

चौथ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने 4 बाद 161 धावांपासून केली. मात्र, बांगलादेशचा अष्टपैलू मेहदी हसन मिराज ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरला. मिराजने सर्वप्रथम अॅलेक्स कॅरीला 30 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर बेयू वेबस्टरला अवघ्या 5 धावांवर त्रिफळाचीत केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही केवळ 8 धावा करून मिराजच्या गोलंदाजीचा बळी ठरला.

एका बाजूला ऑस्ट्रेलियाची विकेट्सची रांग लागली असताना कॅमेरॉन ग्रीनने एकाकी झुंज दिली. त्याने 201 चेंडूंचा सामना करत 4 चौकार आणि एका षटकारासह शानदार 104 धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. अखेर हसन महमूदने ग्रीनला त्रिफळाचीत करत त्याची झुंज संपवली. त्यानंतर मिराजने नॅथन लायनची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाने 284 धावा केल्या आणि बांगलादेशसमोर विजयासाठी केवळ 57 धावांचे लक्ष्य ठेवले.

57 धावांचं लक्ष्यही एका विकेटवर पार (Bangladesh won by 9 wkts)

इतिहास रचण्यासाठी बांगलादेशला फार मोठी मेहनत घ्यावी लागली नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या तन्झीद हसनला खातेही न उघडता बाद करत बांगलादेशला सुरुवातीलाच धक्का दिला. मात्र त्यानंतर शादमान इस्लाम आणि मोमिनुल हक यांनी संयमी फलंदाजी करत संघाला आणखी कोणताही धक्का बसू दिला नाही. दोघांनी मिळून लक्ष्य गाठत बांगलादेशला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा हा एकूण दुसरा विजय आहे. यापूर्वी 2017 मध्ये मिरपूर येथे बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. मात्र, तो विजय मायदेशात मिळाला होता.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now