टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जेंझनी या सरकारच्या झिंज्या उपटल्या, राज ठाकरे यांची जोरदार टीका, म्हटले, सरकारने..

On: July 26, 2026 11:48 AM
Follow Us:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईमध्ये जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमले. राज ठाकरे केंद्र सरकावर टीका करताना दिसले. आदित्य ठाकरे आणि आमित ठाकरेही यावेळी उपस्थित होते.

जेंझनी या सरकारच्या झिंज्या उपटल्या, राज ठाकरे यांची जोरदार टीका, म्हटले, सरकारने..

शिवसेना ठाकरे गटाते नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचे आयोजन केले. याची जोरदार तयारीही सुरू होती. मोठ्या प्रमाणात लोक या सभेत दाखल झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवले. पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आले, त्याचा उत्साह साजरा करायचा म्हणून तुम्ही सर्वजण इथे विजय साजरा करण्यासाठी जमले. या देशातील जेंझनी या सरकारच्या झिंज्या कशा उपटल्या हे आपल्याला या आंदोलनातून कळले. मी इथे आज एक महत्वाची गोष्टी नमूद करतो. आज नीटच्या परीक्षा, पेपरफुटीचे झालेले सर्व आंदोलन आणि त्यानंतर आपल्या देशभरात बसलेल्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी त्यांची आता नावे वाचून दाखवणार आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी काही विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली. यावेळी त्यांनी अनेक राज्यातील विद्यार्थ्यांची नावे वाचली. हे विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यातील होती. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, नीट पेपरफुटीनंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे होती.

माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, तुमच्या आंदोलनाला यश आले आणि हा उत्साह आपण सर्वजण साजरा करूच पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक मिनिटे माैन धारून करून आणि शांत उभे राहू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या जल्लोष सभेत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले आहेत. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी या सभेचे मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

मात्र, काल अचानक दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर जल्लोष सभा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसला. लोक ध्वज हातात घेऊन सभेला पोहोचले आहेत. आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसले. मोठा उत्साह उपस्थितांमध्ये बघायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now