टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत! जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

Sharad Pawar : शरद पवार यांचं आतापर्यंतच राजकारण पाहिलं तर ते धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. शरद पवार यांची ठाम राजकीय भूमिका काय, या बद्दल कोणीच ठोसपणे अंदाज वर्तवू शकत नाही. पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच धक्कादायक घडामोडी पहायला मिळू शकतात.

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले होते. आता तसं काही होणार नाहीय. पण पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत जाण्यासंबंधी दोन मतप्रवाह असल्याच्या बातम्या सुरु आहेत. एकागटाला सत्ताधारी बाकावर बसायचं आहे, दुसऱ्या गटाला विरोधी पक्षात. पण आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाणार अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत 10 आमदार आहेत, 8 खासदार आहेत. शरद पवारांनी या सर्व आमदार, खासदारांसोबत बोलण्याची जबाबदारी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवल्याची चर्चा आहे.

त्या शिवाय भाजपसोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची जबाबदारी सुद्धा एका नेत्यावर दिल्याची माहिती आहे. भाजपसोबत जायचं की नाही? या बाबत आमदार-खासदारांची मतं जाणून घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडणार आहेत. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती आहे.

बैठकीत काय चर्चा झाली?

जानेवारी महिन्यात अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर काही दिवसांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येऊन सत्तेत सहभागी होणार होते असं अजितदादांच्या हयातीत ठरलेलं अशा चर्चा सुरु झालेल्या. त्यानंतर या सर्व चर्चा मागे पडल्या. पण आता पुन्हा एकदा शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपंसोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. पवार गट एनडीए महायुतीत आल्यास सत्तेत काय वाटा मिळेल, या संदर्भात जंयत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोन नेत्यांची चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडोमोडीतून पवार गटाच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या हालचाली दिसून येत आहेत.

शरद पवारांचं राजकारण म्हणजे धक्कातंत्र

शरद पवार यांचं आतापर्यंतच राजकारण पाहिलं तर ते धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. शरद पवार यांची ठाम राजकीय भूमिका काय, या बद्दल कोणीच ठोसपणे अंदाज वर्तवू शकत नाही. आतापर्यंत त्यांच्या अनेक राजकीय खेळी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

शरद पवारांचा पक्ष फूटणार का? आमदार, खासदार…देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगून टाकलं; सस्पेन्स संपला!

एअरटेलची कमाल! 548 च्या प्लॅनमध्ये 589 पेक्षा जास्त व्हॅलिडिटी, दोन्ही प्लॅनच्या किमतीत 41 रुपयांचा फरक

Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा ‘तो’ भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील ‘या’ भागावर अतिवृष्टीचं संकट?

Farmer Loan Waiver: या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज होणार माफ… या शेतकर्‍यांना फटका बसणार… मोठी अपडेट काय?

Eknath Shinde : दोन्ही हाताला सलाईनच्या पट्ट्या… एकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग; तीन मंत्र्यांना दिले मोठे आदेश

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता… काय आहे अपडेट?