top news

मोठी बातमी! राज्यातील नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती लांबणीवर

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली आहे. एक  नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सांगण्य़ात येत आहे.
दरम्यान नोव्हेंबरपासून पोलीस विभागात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. मात्र आता या प्रक्रियेला तात्पुरतया स्वरुपात स्थगिती दिली आहे. यासोबत राज्य राखीव दलातील  पोलीस भरती प्रक्रिया देखील पुढे ढकलण्य़ात आली आहे.
या भरतीबाबत आता पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र तरुणांनी काळजी न करता तयारी सुरु ठेवा असे आवाहन केले जात आहे. कारण याबाबत राज्य सरकार पुढील आठवड्यात निर्णय घेणार आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात पोलीस भरती झाली नाही. याचा फटका हजारो तरुणांना बसला.
कारण वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरत नाहीत. अशा तरुणांवर कोणताही अन्यान न करता त्यांना संधी देण्यासाठी ही पोलीस भरती प्रक्रियेला थोड्या काळासाठी स्थगिती देण्यात आल्याची माहिती समिती आणि सरकारकडून समोर येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button