टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 08 जून 2026 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये अपघात, 8 मजुरांचा मृत्यू: 1600 अंश तप्त लोखंड क्रेनने घेऊन जात होते, संतुलन बिघडल्याने त्यांच्यावरच पडले

  2. होर्मुझमध्ये जळणाऱ्या जहाजातून 24 भारतीयांचे रेस्क्यू: इराण म्हणाला- आता इस्रायलवर हल्ले नाही, भारताने नागरिकांना इराण सोडायला सांगितले

  3. कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे: शरद पवारांची सरकारला सूचना; वादळी पावसाने केळी आणि ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान

  4. वाढती महागाईवरून काँग्रेस आक्रमक: काँग्रेसने चुलीकडून गॅसवर आणले, भाजपने देशाला पुन्हा चुलीकडे नेले- विजय वडेट्टीवार

  5. राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, तर फोडले गेले: पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, सुप्रिया सुळेंचा आरोप

  6. फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप, अनेक इमारती कोसळल्या: 8 जणांचा मृत्यू; 4.5 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा, दोन तासांत 138 भूकंपाचे धक्के

  7. अभिजीत दीपके म्हणाले- कॉकरोच जनता पार्टी देशभरात आंदोलन करेल: स्वतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाईन; 13 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

  8. सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

  9. एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार

  10. अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

  11. इतरांची मुलंबाळं राज्यसभेवर जातात तोच न्याय मलाही मिळावा, राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं छगन भुजबळांची नाराजी, हम कबड्डी के खिलाडी, शतरंज के नहीं, शेरोशायरीतून नाराजी व्यक्त

  12. भुजबळ माझ्या अनुषंगाने बोलले असतील असे मला वाटत नाही, कोणत्याच पक्षाला सर्वांचं समाधना करणं शक्य होत नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण

  13. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज, मविआकडून अर्ज नाही, बिनविरोध निवड निश्चित

  14. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरेंचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा, गोकुळ गीतेंसोबत सकारात्मक चर्चा सुरु, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, तर नाशिकचा निर्णय झाल्यानंतर जळगावचाही तिढा सुटेल, महाजनांचा विश्वास

  15. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं, शिंदेंना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील, बच्चू कडूंचं वक्तव्य

  16. पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला हव्यात, उगाच गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना सुनावलं

  17. ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदारांचा सुद्धा भाजपला पाठिंबा

  18. नीट परीक्षा घोटाळ्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार, एसआयआर मुद्द्यावर सरन्यायाधीशांना पत्र पाठवणार, इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत 5 मुद्द्यांवर एकमत, तर 8 ऑगस्टला हैदराबादला पुढची बैठक

  19. शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 719 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

  20. पुढील वर्षापासून 62 टक्के लोकांना गृह कर्ज अन् वाहन कर्ज मिळणं अवघड होण्याची शक्यता, आरबीआयकडून नव्या नियमांचा ड्राफ्ट जारी

  21. शाओमी 17T लाँच, किंमत ₹54,999 पासून सुरू: 120x झूमसह 50MP लायका कॅमेरा आणि 6500mAh ची मोठी बॅटरी; शाओमी TV FX मिनी देखील सादर

  22. चांदी ₹15,748 ने घसरून ₹2.41 लाखांवर: 8 दिवसांत ₹22 हजारांची घसरण; सोनेही ₹3470 ने स्वस्त, 10 ग्रॅमसाठी मोजा ₹1.51 लाख

  23. मुल्लानपूर कसोटी तिसऱ्याच दिवशी निकाली, शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा आजवरचा सर्वात मोठा कसोटी विजय, अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी पराभव, पदार्पणवीर मानव सुतारची फिरकी प्रभावी, वॉशिंग्टन सुंदरचीही कमाल

  24. टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा हाती आली असली तरी आपल्या स्वभावात किंवा विचारसरणीत कोणताही बदल करणार नाही, टी 20 चा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य

  25. 29 वर्षीय झ्वेरेव्हने पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले: फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत कोबोलीला हरवले, पाच सेटपर्यंत चालला सामना

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा