टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Vaibhav Sooryavanshi In Sri Lanka : सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी.

Vaibhav Sooryavanshi In Sri Lanka : सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वैभवची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएलनंतर आता त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय अ संघासोबत तो श्रीलंकेत दाखल झाला असून, विमानतळावर घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड

भारतीय अ संघ 9 जूनपासून श्रीलंकेत होणाऱ्या तिंरगा एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी संघ श्रीलंकेत पोहोचल्यानंतर विमानतळाबाहेर वैभव सूर्यवंशीला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. वैभव विमानतळातून बाहेर येत असताना काही श्रीलंकन चाहते त्याच्याजवळ वारंवार येऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला त्याने शांतपणे प्रतिसाद दिला, मात्र चाहत्यांची गर्दी वाढत गेल्याने तो काहीसा अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. शेवटी त्याने हात जोडून चाहत्यांना थोडे दूर राहण्याची आणि स्वतःला थोडी जागा देण्याची विनंती केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दांबुलामध्ये रंगणार तिंरगा मालिका

भारतीय अ संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करत आहे. या स्पर्धेतील सर्व सामने दांबुला येथे खेळवले जाणार आहेत. स्पर्धेत भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ असे तीन संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना यजमान श्रीलंकाविरुद्ध होणार आहे. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळवून देण्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.

इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी निवड जवळपास निश्चित

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने अनेक अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध निर्भीड फलंदाजी केली. त्यामुळे त्याला लवकरच वरिष्ठ भारतीय संघात संधी मिळावी, अशी मागणी अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. याच कारणामुळे आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या टी-20 मालिकांसाठी वैभवच्या नावाचा गंभीरपणे विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. 6 जून रोजी निवड समिती या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करणार असून, त्यामध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान मिळण्याची शक्यता अत्यंत मजबूत मानली जात आहे.

हे ही वाचा –

Abhijit Dipke : अमेरिकेतून अभिजीत दीपके भारतात; स्वागतासाठी जनसागर लोटला; पोलिसांचा पहारा अन्…

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video