टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 5 जून 2026 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल, गोव्यात पावसाला सुरुवात, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण

  2. महायुतीकडे बहुमत असताना बिनविरोध कशासाठी? संजय राऊतांचा सवाल, माघारनाट्यावर 150 कोटी खर्च केल्याचा आरोप

  3. अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, ‘भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..’

  4. मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला

  5. ट्रम्प म्हणाले- भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला: आता आम्ही शुल्कातून खूप कमावत आहोत, तरीही करार करू कारण मला मोदी आवडतात

  6. शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- ही पुढील विजयाची नांदी; मविआवर जोरदार टोलेबाजी

  7. मोदी म्हणाले- जनता काँग्रेसवर नाराज, म्हणूनच कर्नाटक CM बदलले: ज्यांनी देशाला दुसऱ्यांवर निर्भर ठेवले, ते आत्मनिर्भर भारताची थट्टा करत आहेत

  8. राहुल यांचा आरोप- ग्रेट निकोबार प्रकल्पाचा उद्देश सुरक्षा नाही: एका व्यावसायिकाला फायदा पोहोचवायचा आहे; 16 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये डायव्हिंग करताना दिसले

  9. संख्याबळ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली: मग पैसे घेतल्याचा आरोप कसा करता? संजय शिरसाट यांचा मविआला सवाल

  10. ट्रम्प म्हणाले- इराणच्या सर्वोच्च नेत्याला भेटून अभिमान वाटेल: करार झाल्यास भेट शक्य, युरेनियम घेण्यासाठी सैन्य पाठवणार होते, पण यात धोका

  11. MPSC उमेदवारांसाठी खास ‘निपूण सेतू’: UPSC च्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर निर्णय; अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्यांना होणार फायदा

  12. ‘मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील’; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!

  13. ध्रुव जुरेल OUT, ऋषभ पंत IN… अन् 2 स्टार खेळाडूंचे पदार्पण

  14. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानं काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेची नाराजी, पुण्यात मविआबाबत पुनर्विचार करावा, काँग्रेसच्या शहराध्यक्षांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, तर दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच, शिवसेनेच्या वसंत मोरेंची टीका

  15. अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई

  16. दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणू बाळ माने याने खेळी केली, थापेबाजी करणे हा त्याचा खरा धंदा, कोकण विधानपरिषदेतून माघार घेतल्यानंतर बाळ माने यांच्यावर माजी खासदार विनायक राऊत संतापले

  17. निवडणूक आली की बाळ माने पाच वर्षांची तडजोड करतो, त्याला सिरियस घेऊ नका, त्याच्यावर विश्वास टाकायची गरज नाही. भाजपचे खासदार नारायण राणे यांची बोचरी टीका

  18. माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर, टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता

  19. मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला, जीवन जानकरांचा अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार उत्तम जानकरांचा आरोप

  20. उत्तम जानकर यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हा आमच्या घरातला विषय, एकत्रित बसवून संपवू, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं उत्तर

  21. मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले, पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य

  22. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेला संपवलं, नंतर मृतदेह दरीत फेकला; रायगड हादरलं

  23. सलग तिसऱ्यांदा रेपो रेट जैसे थे, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांची घोषणा, गृहकर्जदारांना दिलासा, गृहकर्जाचा हफ्ता जैसे थे राहणार

  24. मी भारतासाठी निघालो, माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतासाठी रवाना

  25. भारताच्या टी 20 संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे जाण्याची शक्यता, निवड समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार

  26. 593 धावा करूनही कुणीच खरेदी केलं नाही, कर्नाटकच्या महाराजा क्रिकेट टी 20 लीगमध्ये केएल राहुलच्या नावावर बोलीच नाही

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now