टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 3 जून 2026 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार

  • उद्या कार्यकर्त्यांना बोलावून समीर सत्तारांचा अर्ज मागे घ्यायला लावणार: एकनाथ शिंदेंचा आदेश पाळणार! मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर अब्दुल सत्तार बॅकफूटवर

  • नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन: रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांसह शशिकांत शिंदे पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्ते आक्रमक

  • ‘माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब गेले’: गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक; ‘एक पेड बाप के नाम’चा केला संकल्प

  • कुवेत विमानतळावर इराणी हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू, 63 जखमी: अनेकांची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन तळांवरही ड्रोन हल्ला

  • दिल्लीत भीषण अग्नितांडवात, लेमन ग्रीन या पंचतारांकीत हॉटेलला आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू

  • ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 60 आमदारांचा वेगळा गट स्थापन; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

  • ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड

  • शिवसेनेचं बंड शमलं, कोकण विधान परिषद निवडणुकीतून जुईली दळवींचा अर्ज मागे; अनिकेत तटकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा

  • विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा मविआला दे धक्का, 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच आऊट, नाशिकसह सोलापूर यवतमाळ आणि अमरावतीमध्ये विजयाचा मार्ग सोपा

  • महायुती अन् मविआला बंडखोरांमुळे डोकेदुखी; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार

  • आजी-माजी आमदार-खासदार, नगरसेवकांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणारे सरकारी कर्मचारीही अपात्र, 2 लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ होणार

  • शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, कर्जमाफी योजनेच्या आदेशाविरोधात संताप, शेतकरी संघटनांसह विरोधक आक्रमक

  • होय आम्ही बेचैन, मोठा भाऊ आमचा पक्ष संपवू पाहतोय, अब्दुल सत्तारांचं पुन्हा भाजपकडे बोट, दोन्ही शिवसेना विलिनीकरणाच्या प्रश्नावर म्हणाले, ठाकरे-शिंदेंनी चर्चा करावी

  • शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही, गायकवाडांची प्रतिक्रिया

  • जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची बैठक, अब्दुल सत्तारांना महायुतीचे नियम पाळण्याच्या सूचना

  • प्राजक्त तनपुरेंचं माझ्याशी बोलणं झालं असतं तर ते भाजपमध्ये गेले नसते, मामा जयंत पाटलांचं पहिल्यांदाच मोठं भाष्य

  • कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत 6 जूनला आंदोलन, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, सोनम वांगचूक, असीम सरोदे आंदोलनात सहभागी होणार

  • डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now