टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rohit Pawar : रोहित पवारांना शरद पवारांची ही गोष्ट खटकली का? म्हणून त्यांनी पक्षाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा

On: May 20, 2026 10:47 AM
Follow Us:

Rohit Pawar : रोहित पवार हे त्यांचे आजोबा आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार आहेत.

Rohit Pawar : रोहित पवारांना शरद पवारांची ही गोष्ट खटकली का? म्हणून त्यांनी पक्षाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा

सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत महत्वाच्या घडामोडी घडत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोनही बडे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवर त्यांची नाराजी आहे. या दोन्ही नेत्यांना पक्षात डावललं जात असल्याचा संदेश गेला. त्यानंतर आता शरदचंद्र पवार यांच्या पक्षात नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार आहे. पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित असतील. ते पुण्यामध्ये आहेत. या अनुपस्थितीवरुन ते नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

रोहित पवार यांच्या नाराजीमागे कारण असं आहे की, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांचं कौतुक सुद्धा केलं. त्यांना क्षमतावान नेता म्हटलं. त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करुन घ्यायचा हे सध्याच्या पक्ष नेतृत्वाच्या हातात आहे, असं पवार म्हणाले. रोहित पवार यांना हीच गोष्ट खटकली असल्याचं बोललं जात आहे. रोहित पवार हे सातत्याने सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या नेत्यांना लक्ष्य करत आहेत आणि पवारांनी त्यांनाच भेट दिली, त्यांचं कौतुक केलं. हे रोहित पवार यांच्या नाराजीमागे कारण असल्याचं बोललं जातय.

दोन नेत्यांनाच टार्गेट केलं गेलय

कारण शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही संभ्रामावस्था आहे. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतत या दोन नेत्यांनाच टार्गेट केलं गेलय. त्याशिवाय आजच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्यावर चर्चा होणार का?. हा सुद्धा मुद्दा आहे. अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं, असे दावे अजितदादांच्या निधनानंतर करण्यात आले. त्यावरुन आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुद्धा रंगलं. बैठका झाल्या, नाही झाल्या या बाबत दोन्ही राष्ट्रवादीकडून वेगवेगळे दावे करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now