टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूका जाहीर; 18 जून रोजी होणार मतदान, पाहा A टू Z माहिती

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

Vidhan Parishad Election 2026: पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर करण्यात आली आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. (Vidhan Parishad Election 2026)

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून

पुढील मतदारसंघात होऊ शकते निवडणूक- (Vidhan Parishad Election 2026)

  1. सोलापूर
  2. अहिल्यानगर
  3. ठाणे
  4. जळगाव
  5. सांगली-सातारा
  6. नांदेड
  7. यवतमाळ
  8. पुणे
  9. भंडारा-गोंदिया
  10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  11. नाशिक
  12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
  13. अमरावती
  14. धाराशिव-लातूर-बीड
  15. परभणी-हिंगोली
  16. छत्रपती संभाजी नगर-जालना
  17. नागपूर
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

NEET Exam Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सर्वात मोठी कारवाई, मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

मोठा विध्वंस! थेट अणुऊर्जा प्रकल्पाला उडवलं, भीषण हल्ल्याने जगात खळबळ, आगीच्या ज्वाळा थेट…

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! कर्जमाफीची तारीख समोर, CM फडणवीसांची मोठी घोषणा

ज्याची भीती तोच इशारा, प्रशासनाकडून मोठा इशारा, 10 जिल्ह्यांवर संकट, पुढील 7 तासात..

राष्ट्रवादीत चाललंय काय? मोठ्या घडामोडींना वेग, पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर आनंद परांजपे थेट सिल्व्हर ओकवर