maharashtra
मी काय म्हातारा झालोय का?; शरद पवारांची गुगली
- सध्या देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशाची आणि राज्याची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची जपणूक करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे पण तसे होत नाही. जेव्हा माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती.
तेव्हा तीन महिन्यांच्या आत 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याचाच दाखला देत पवार यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी पवारांनी संवाद साधला.त्यावेळी एका शेतकऱ्याने पवार यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर पवार म्हणाले, जेजुरीच्या सहकऱ्यांनी सांगितले, बाहेर फिरु नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही. पवार असं म्हणाले आणि उपस्थित असलेल्या सर्वांमध्येच हश्या पिकाला.