खुशखबर! भारत-पाक सामना ‘फ्री’ पाहता येणार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ एक लाख प्रेक्षकांसमोर खेळतील. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना असेल. दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. गेल्या टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

मेलबर्नमध्‍ये प्रेक्षक स्टेडियमजवळ जमू लागले आहेत. भारतीय चाहते हातात तिरंगा घेऊन पोहोचत आहेत. मेलबर्नच्या बाजारपेठांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ११ टी-20 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारताने आठ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने केवळ तीन सामने जिंकले आहेत. T20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर दोघांमध्ये ६ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५ विजय मिळवले आहेत. तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon