टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला : कोळे परिसर हादरला; पेट्रोलच्या वादातून वृद्धाची हत्या, पोलिसांनी ५ तासांत आरोपीला पकडले

On: April 26, 2026 11:19 AM
Follow Us:

सांगोला – कोळे ता सांगोला येथील ७६ वर्षीय वृद्धाच्या खून प्रकरणाचा सांगोला पोलिसांनी अवघ्या ५ तासात छडा लावला असून , गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या आहेत सदर वृद्धाचा खून पेट्रोलला जास्त पैसे घेतल्याच्या कारणावरून मृताच्या भावकीतील तरुणाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.

बाबासाहेब भानुदास देशमुख ( वय-७६ रा बाणुरगड ता खानापूर जि सांगली ) असे मृताचे नाव आहे तर संजय देशमुख -३५ रा .सदर असे आरोपीचे नाव आहे. याबाबत, अनिल बाबासाहेब देशमुख यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मृत बाबासाहेब देशमुख यांचे बानुरगड गावात किराणा दुकान असून , ते दुकानात किरकोळ पेट्रोल विक्री करीत होते मागील १५ दिवसांपूर्वी आरोपी संजय देशमुख यांनी मृताच्या दुकानातून एक लिटर पेट्रोल घेतले असता त्यांनी १३० रुपये घेतले म्हणून आरोपीने त्यांना इतरांना १२० रुपये आणि मला १३० रुपये का ? म्हणून मृताला जाब विचारला होता शिवाय याचा राग ही त्याच्या डोक्यात होता. दरम्यान शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास मृत बाबासाहेब देशमुख हे स्वतः कडील एमएटी वरून कोळा येथील आठवडा बाजारासाठी आले होते. त्यांनी एम एटी दुरुस्तीसाठी मिस्त्रीकडे दिली त्यानंतर आरोपी संजय देशमुख यांनी मृत बाबासाहेब देशमुख यांना दुचाकीवरून बोकडाचे मटण खाण्यासाठी घेवून गेला वाटेत बाणुरगड ते कोळे कॅनालजवळ संजय देशमुख यांनी त्याच्याकडील कोयत्याने बाबासाहेब देशमुख यांच्या मानेवर , डोक्यात व हातावर मारुन जीवे ठार मारुन तेथून निघून गेला. शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पोलिसांनी माहिती दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे , पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेवून तपासाची सूत्रे वेगाने हलवली. तपासकामी स्वान पथक ,ठसे तज्ञ ,फॉरेन्सिक लॅब यांची मदत घेण्यात आली मात्र सदर खुनाविषयी कोणताही पुरावा नसताना पोलीसांनी गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या पाच तासात संशयित संजय देशमुख या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार मोरे, भारत वाघे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील डीबी पथकाचे पोलीस हवलदार नवनाथ सावंत दत्ता वाजाळे असलम काझी सद्दाम नदाफ पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील कोळा बीटचे पोलीस हवालदार केदारनाथ भरमशेट्टी , प्रकाश कोष्टी, सचिन वाघ पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे , ढोबळे यांनी केली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now