टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

कॅच घेताना डोक्यावर पडला, लुंगी एन्गिडीला जबर दुखापत! डोळेही उघडेना, एम्ब्युलन्समधून नेण्याची वेळ

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला. खरं तर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 264 धावांचं बलाढ्य आव्हान दिलं आहे. पण लुंगी एनगिडीला रुग्णवाहिकेतून नेण्याची वेळ आल्याने एक गोलंदाज शॉर्ट पडला.

कॅच घेताना डोक्यावर पडला, लुंगी एन्गिडीला जबर दुखापत! डोळेही उघडेना, एम्ब्युलन्समधून नेण्याची वेळ

आयपीएल 2026 स्पर्धेतील 35वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 20 षटकात 2 गडी गमवून 264 धावा केल्या आणि विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी आलेल्या प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी आक्रमक सुरूवात केली. पहिल्या चेंडूपासून तोडफोड सुरू केली. त्यामुळे बलाढ्य स्कोअर असला तरी दिल्ली कॅपिटल्सवर दबाव वाढला. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 21 धावा आल्या. त्यामुळे कर्णंधार अक्षर पटेल चेंडू हातात घेण्याचं ठरवलं. कारण पंजाब किंग्सवर दबाव वाढवायचा तर विकेट हवी होती. त्यामुळे अक्षर पटेल गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसरा चेंडू वाइड टाकल्याने परत टाकावा लागला. या चेंडूवर प्रियांश आर्याने उत्तुंग फटका मारला आणि चेंडू खूपच वर चढला. लुंगी एनगिडी हा झेल सहज पकडेल असं वाटलं होतं. पण वेगळंच काही घडलं.

लुंगी एन्गिडी झेल पकडण्यासाठी चेंडूवर नजर ठेवून होता. तसेच मागे मागे वेगाने जात होता. चेंडूंच्या बरोबर खाली आला आणि झेल पकडणार असं वाटलं आणि अनर्थ घडला. झेल पकडताना खाली पडला आणि डोक्यावर आदळला. झेल सुटला पण लुंगी एन्गिडी उठत नसल्याने सर्वच खेळाडूंच्या त्याच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे काही तरी मोठं झाल्याचं दिसून आलं. डॉक्टरांनी तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली आणि तपासणी सुरू केली. यावेळी त्याने डॉक्टरांना प्रतिसाद दिला. पण त्याची प्रकृती काही ठीक नसल्याचं दिसून आलं. डॉक्टरांनी तात्काळ रुग्णवाहिका मैदानात बोलवून घेतली. यावेळी एनगिडीचे दक्षिण अफ्रिका संघातील सहकारी डेविड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांची धाकधूक वाढली. इतकंच काय पंजाब किंग्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने मैदानात धाव घेतली. एनगिडीला रुग्णवाहिकेतून नेलं असून पुढे तपासणी केली जाणार आहे.

 

लुंगी एनगिडीला मैदानाबाहेर नेल्यानंतर त्याची जागा श्रीलंकेचा गोलंदाज दुशमंथा चमीरा याने घेतली. आता दुशमंथा चमीरा गोलंदाजीचा पर्याय म्हणून दिल्ली कॅपिटल्सकडे असणार आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video