टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

इराणमध्ये खळबळ, अमेरिकेसोबतच्या युद्धात मोठा हाहाकार, सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामध्येच आता मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी पुढे येत आहे. मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल पहिल्यांदाच खुलासा करण्यात आला.

इराणमध्ये खळबळ, अमेरिकेसोबतच्या युद्धात मोठा हाहाकार, सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या..

इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याने इराणचे सूत्र आपल्या हातात घेतली. मात्र, या हल्ल्यात तो देखील गंभीर जखमी झाला. मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीलबद्दल विविध चर्चा रंगताना दिसतात. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे आलीये. हल्ल्यात त्यांच्या शरीरावर अनेक मोठ्या जखमा झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोजतबा खामेनेई यांच्यावर गुप्तपणे उपचार सुरू आहे. मोजतबा खामेनेई नक्की कुठे आहेत, याबद्दल अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. सुरूवातीला एक रिपोर्ट आली होती की, मोजतबा खामेनेई यांचा पाय कापण्यात आला. आता नुकताच नवीन रिपोर्ट पुढे आला. या रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेई यांच्या पायाचे आतार्यंत 3 वेळा ऑपरेशन झाले. त्यांना आर्टिफिशिय पाय लावण्यात आला.

मोजतबा खामेनेई यांच्या चेहऱ्यावरही गंभीर दुखापत आहे. ओठाजवळही मोठी जखम आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यास त्रास होत आहे. मोजतबा खामेनेई यांच्या हाताचेही ऑपरेशन झाले, जे हळूहळू ठीक होत आहे. आता मोतजबा खामेनेई यांची प्लास्टिक सर्जरी होत असल्याचीही माहिती मिळत आहे. मोजतबा खामेनेई यांच्यावर नक्की उपचार कुठे सुरू आहेत, याची कल्पना कोणालाही देण्यात आली नाही.

अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, मोजतबा खामेनेई यांच्यावर नक्की कुठे उपचार सुरू आहेत, याची माहिती जर इस्त्रायलला मिळाली तर ते त्यांच्यावर हल्ला करू शकतात. राष्ट्रपति मसूद पेजेश्कियान ते स्वत: एक हार्ट सर्जन आहेत, ते मोजतबा खामेनेई यांच्या देखरेख करत आहेत. यासोबतच आरोग्य मंत्रीही तिथे उपस्थित आहेत. मुळात म्हणजे इराणची खरी ताकद इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या हाती गेली आहे.

मोजतबा खामेनेई यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. मात्र, आतापर्यंत मोजतबा खामेनेई यांनी इराणी जनतेसाठी व्हिडीओ किंवा ऑडिओ कोणतीही क्लिप शेअर केली नाही. फक्त त्यांच्याकडून इराणी जनतेला संदेश देण्याकरिता पत्र प्रसिद्ध करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती एका वाईट स्थितीवर पोहोचली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now