Raja Shivaji Movie: रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमधील काही फ्रेम्स अक्षरश: नजर खिळवून ठेवणाऱ्या आहेत.

Raja Shivaji Movie
1/16
रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा रितेश देशमुख आणि जिनेलिया यांच्यासाठी अनेक कारणांमुळे खास ठरला आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शनही स्वतः रितेश देशमुख यानंच केलंय.
2/16
राजा शिवाजीच्या ट्रेलरमधील काही फ्रेम्स अक्षरश: नजर खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
3/16
राजा शिवाजी चित्रपटात अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही महाराणी सईबाईंची भूमिका साकारत आहे.
4/16
जिनेलिया या सिनेमात महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. पण, हा सिनेमा आणखी एका कारणानं रितेश-जिनेलियासाठी खास ठरलाय. या सिनेमातून रितेशचा धाकटा मुलगा राहिल देशमुख (Rahyl Deshmukh) हादेखील सिनेसृष्टीत पदार्पण करतोय.
5/16
येत्या 1 रोजी महाराष्ट्र दिनाला राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
6/16
राजा शिवाजी चित्रपटात जेनिलिया देशमुख, विद्या बालन, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, संजय दत्त, बोमण इरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी एकत्र आली आहे.
7/16
राजा शिवाजी चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारातील बडी बेगमची भूमिका साकारली आहे.
8/16
राजा शिवाजी चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन याने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांची भूमिका साकारली आहे.
9/16
अभिनेते सचिन खेडेकर यांनी राजा शिवाजी चित्रपटात शहाजी राजांची भूमिका साकारली आहे.
10/16
अभिनेता अमोल गुप्ते यांनी राजा शिवाजी चित्रपटात आदिलशाहची भूमिका साकारली आहे.
11/16
राजा शिवाजी चित्रपटात अफजलखानाची भूमिका अभिनेता संजय दत्त याने साकारली आहे.
12/16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता रितेश देशमुख.
13/16
राजा शिवाजी चित्रपटात प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईचा प्रसंग दाखवण्यात आला आहे.
14/16
अभिनेता जितेंद्र जोशी याने राजा शिवाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य वकील गोपीनाथपंत बोकील यांची भूमिका साकारली आहे. याच गोपीनाथपंत बोकील यांनी अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यासाठी राजी केले होते.
15/16
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीचा प्रसंग
16/16
अफजलखानाने दगाफटका केल्यानंतर शिवाजी महाराजांनी खानाच्या पोटात वाघनखं खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला होता. हा प्रसंग राजा शिवाजी चित्रपटात पाहायला मिळेल.












