टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

US Iran War : ज्याची भीती होती तेच घडलं, अखेर चीनची एन्ट्री, अमेरिकेनं इराणच जहाज जप्त करताच थेट…, मोठी खळबळ

On: April 20, 2026 7:41 PM
Follow Us:

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं इराणचं एक जहाज आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे, आता या सर्व प्रकरणामध्ये चीनची एन्ट्री झाली आहे.

US Iran War : ज्याची भीती होती तेच घडलं, अखेर चीनची एन्ट्री, अमेरिकेनं इराणच जहाज जप्त करताच थेट..., मोठी खळबळ
 अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. मात्र तणाव काही कमी झालेला नाही. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा बंद केला. त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानात वाटाघाटीच्या चर्चेची पहिली फेरी पार पडली होती, मात्र या फेरीमध्ये कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही, दरम्यान त्यानंतर आता दुसऱ्या फेरीच्या चर्चेची तयारी सुरू झाली आहे. मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेनं इराणचं व्यापारी जहाज टॉस्का आपल्या ताब्यात घेतलं आहे. याबाबत इराणकडून माहिती देण्यात आली आहे. तसेच आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ असा इशाराही यावेळी इराणने अमेरिकेला दिला आहे.

अमेरिकेनं इराणचं जहाज ताब्यात घेतल्यानंतर आता इराण अधिक आक्रमक झालं आहे, अमेरिकेनं युद्धविरामाचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप इराणकडून करण्यात आला आहे. त्यांनी आमचं एक जहाज ताब्यात घेतलं आहे, आम्ही त्यांना याचं प्रत्युत्तर देऊ असं इराणने म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता, आता हा युद्धविराम संपण्यासाठी अवघे काही तास बाकी असतानाच अमेरिकेनं इराणचं जहाज ताब्यात घेतल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळतं आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे चीनची एन्ट्री झाली आहे. चीनकडून अमेरिकेच्या या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेनं इराणचं जहाज ताब्यात घेतलं आहे, त्यावर चीनकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे, अमेरिकेनं उचललेल्या या पावलामुळे आम्ही चिंतीत आहोत असं चीनने म्हटलं आहे.

दरम्यान चीन इराणला मदत करत असल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून करण्यात येत आहे. तसेच चीननेच अमेरिकन सैन्यदलाची माहिती सॅटेलाईटद्वारे इराणला पुरवल्याचा आरोप देखील होत आहे. माहिती मिळाल्यामुळेच इराणला आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन सैन्यदलावर एवढे अचूक हल्ले करता आले अशी देखील चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now