टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IPL मध्ये काळी जादू? लिंबू फिरवताच गेली विकेट, Video तुफान व्हायरल

IPL 2026 : आयपीएल मध्ये काळी जादू तर केली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे, ज्यात एक चाहता काळी जादू करताना दिसत आहे.

IPL मध्ये काळी जादू? लिंबू फिरवताच गेली विकेट, Video तुफान व्हायरल

आयपीएल स्पर्धेचे सामने मोठ्या उत्साहात सुरू आहेत, अनेक चाहते मैदानात पोहचून आपल्या लाडक्या खेळाडूंना सपोर्ट करताना दिसत आहेत. अशातच आता आयपीएल मध्ये काळी जादू तर केली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा एक चाहता हातात लिंबू घेऊन काळी जादू करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काळी जादू केल्यानंतर पुढच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज बाद होतो. नेटकऱ्यांनी याला जादूशी जोडले असल्याने हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

लिंबू फरवलं आणि लगेच विकेट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की हैदराबादचा चाहता हातात लिंबू घेऊन काही विचित्र हालचाली करतो, जणू काही काळी जादू करत आहे. तो हे कृत्य पूर्ण करताच पुढच्या चेंडूवर CSK चा फलंदाज बाद होतो. हा संपूर्ण क्षण इतक्या परफेक्ट टायमिंगने घडतो की पाहणारेही थक्क होतात. विकेट पडताच तो चाहता आनंदाने उड्या मारतो आणि आसपास बसलेले लोकही हसू लागतात.

 

इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर मीम्स आणि कमेंट्सचा पूर आला आहे. काही युजर्स मजेत म्हणत आहेत, ‘CSK च्या पराभवाचे खरे कारण हे लिंबूची काळी जादू आहे, तर काहीजण याला आयपीएलमधील सर्वात फनी क्षण म्हणत आहेत. अनेकांनी असेही लिहिले की, ‘या फॅनला प्रत्येक सामन्यात बोलवा, तो टीमला जिंकवेल.’

युजर्सच्या मजेदार प्रतिक्रिया

सोशल मीडियावर युजर्स या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘DRS सोडा, आता लिंबू रिव्ह्यू सिस्टम आणा’, तर दुसऱ्याने म्हटले, हे आयपीएल आहे की तंत्र-मंत्र लीग?. काही लोक याला फक्त योगायोग मानत आहेत, पण बहुतेक जण हा फनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून हसत आहेत. हा व्हिडिओ @GemsOfCricket नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral

IND vs SL: श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

6,6,4,4,4,4..! वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेला दणका, पुन्हा ठोकलं दणदणीत अर्धशतक

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाची एन्ट्री! जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या डोक्यावरून ‘क्लासिक’ षटकार, पाहा Video